बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
By Administrator - 1/17/2026 5:10:48 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीराचे आयोजन.
कोल्हापूर दि. 17 :- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकानंद कॉलेजमधील एन.सी.सी.व एन.एस.एस. विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 21 रक्तबाटल्यांचे संकलन करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना डॉ.एस.पी.थोरात म्हणाले, रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान केल्यामुळे एखाद्यास जीवदान तर मिळतेच पण त्याचबरोबर एका सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधानही मिळते.
या शिबिराचे आयोजन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी 21 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक भान जपले आहे. यावेळी प्रा.डॉ.अश्विनी पाटील, प्रा.पी. वाय. राठोड, विवेकानंद, इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही रक्तदानात सहभाग केला. यावेळी सीपीआर ब्लड बॅन्केचे अधिकारी डॉ. सुरभी खटोड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीराचे आयोजन एन.सी.सी. प्रमुख मेजर सुनीता भोसले, लेप्टनंट जितेंद्र भरमगोंडा, डॉ.संदीप पाटील, डॉ.प्रविण बागडे, प्रा.हेमंत पाटील यांनी केले होते. या शिबीरास 5 महाराष्ट् व 6 महाराष्ट्र एन.सी.सी. ग्रूपच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबीरात संस्था परिसरातील गुरुदेव कार्यकर्ते, आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीं यांनी रक्तदान केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
|