विशेष बातम्या

‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर संपन्न...

Blood donation camp held in Gokul on the occasion of Labor Day


By nisha patil - 1/5/2025 5:24:00 PM
Share This News:



‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर संपन्न...

कोल्‍हापूर, ता.०१: १ मे २०२५ जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल व कोल्हापूर व वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये ७८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, रक्तदान हि एक जनसेवाच आहे. रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकते. “ रक्तदान हेच श्रेष्ठदान ” या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल गोकुळ कर्मचारी संघटनेचे कौतुक केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना रेनसूट संघटनेकडून देण्यात आले. यावेळी आयटक कामगार संलग्न गोकुळ कर्मचारी, मार्व्हलस कंपनी, टूलेक्स कंपनी, कृषी संघ, लक्ष्मी लाडा कंपनीचे तसेच एम.आय.डी.सी. तील कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, डेअरी महाव्यवस्थापक  अनिल चौधरी, बोर्ड  सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ. व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संभाजी शेलार, कॉ.संदेश पाटील, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ.कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.  


‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्य रक्तदान शिबीर संपन्न...
Total Views: 86