बातम्या
कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यशस्वी
By nisha patil - 4/10/2025 4:00:51 PM
Share This News:
कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यशस्वी
कोल्हापूर दि. ४ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित आणि बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात तब्बल २०० रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मा. गावडे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे दुसऱ्याचा जीव वाचविण्याचे समाधान मिळते.”
पतसंस्थेचे अध्यक्ष मा. हितेंद्र साळुंखे यांनी दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रूप रक्तगटासाठी ९९७००१८००१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्यात आले. रक्तदात्यांना स्मार्ट वॉच, एअर बड्स, पेन ड्राईव्ह अशा भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर यशस्वी
|