बातम्या
राजे शिवाजी व्यायाम मंडळ, येवती तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
By nisha patil - 9/18/2026 6:33:58 PM
Share This News:
राजे शिवाजी व्यायाम मंडळ, येवती तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
कागल प्रतिनिधी अजित बोडके येवती - राजे शिवाजी व्यायाम मंडळ, येवती या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सुमारे 50 ते 60 जणांनी रक्तदान केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात या सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ओंकार पोवार, उपाध्यक्ष अनिकेत आळवेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते फिरोज मुलाणी, सुनील शेळके, रणजित शेळके (फौजी), सुजित शेळके, राजू जमादार, संदीप जाधव, शाहाजी शेळके, महादेव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
राजे शिवाजी व्यायाम मंडळ, येवती तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
|