बातम्या
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
By nisha patil - 9/19/2026 8:01:27 PM
Share This News:
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
कागल प्रतिनिधी अजित बोडके नवरसवाडी (पिंपळगल्ली) ता. ... सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ चे औचित्य साधून स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्स, नवरसवाडी (पिंपळगल्ली) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.
"रक्तदान करा, जीवनदान द्या!" या संदेशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सामाजिक बांधिलकीचा सण आहे, हा विचार ठेवून मंडळाने हा उपक्रम राबवला.
या शिबिराला ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला मंडळाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
|