ताज्या बातम्या
ईद ए मिलाद निमित्त राज्यभर रक्तदान शिबिरं
By nisha patil - 9/16/2025 10:58:39 AM
Share This News:
कोल्हापुर -: ईद ए मिलाद (प्रेषित मुहम्मद जयंती) या पवित्र निमित्ताने यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र या युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल ८०२० लोकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
कोल्हापुरातही या उपक्रमाचा भाग म्हणून १४ सप्टेंबर रोजी मुस्लिम बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ३८ उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. शिबिराच्या यशात अध्यक्ष तैहसीन काझी यांचे मार्गदर्शन व मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर यांचे सहकार्य लाभले.
सोहेल जामखंडीकर, निहाल शेख, मुस्तफा बागवान, अरबाज बागवान, उमर मुजावर, इजहारूल पटेल, जैद नांदनीवालां, अशपाक पठान आणि इतर कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
"रक्तदान हे श्रेष्ठ दान" या भावनेतून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.
ईद ए मिलाद निमित्त राज्यभर रक्तदान शिबिरं
|