बातम्या
आजऱ्यात भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न
By nisha patil - 1/3/2026 11:57:33 PM
Share This News:
**आजऱ्यात भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:-सालाबाद प्रमाणे माजी उपगराध्यक्ष आजरा,अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दाजी टोपले नाट्य मंदिर येथे स्वराज्य तालीम मंडळातर्फे भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाट्न प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाट्न प्रसंगी संजय पाटील(भादवण), संतोष भाटले, बामणे भाऊजी, विजय थोरवत, महेश खेडेकर, संतोष चौगले, संकेत सावंत, परेश पोतदार, जितेंद्र भोसले, गौतम भोसले, तौफिक आगा आणि शरीफ खेडेकर उपस्थित होते.
जबरदस्त आणि नेटक्या नियोजनात या स्पर्धा पार पडल्या. नेत्रदीपक प्रकाश व्यवस्था, संगीताचा जबरदस्त ठेका आणि तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद या त्रिवेणी संगमामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती.
स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धेकांनी भाग घेतला होता. तर अमोल जाधव, महागाव याने आजरा श्री 2026 टायटल वर आपले नाव कोरले. स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांचे हस्ते टायटल विजेता अमोल जाधव याला स्मृती चिन्ह आणि बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून संजय धुरे(उत्तूर), प्रा. केसरकर सर (गडहिंग्लज), झाकीरभाई नदाफ(गडहिंग्लज)यांनी चोख कामगिरी पार पाडली.
आजऱ्यात भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न
|