बातम्या
कोल्हापुरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला;
By nisha patil - 7/15/2025 8:58:58 PM
Share This News:
कोल्हापुरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला;
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील बेपत्ता महिलेचा मृतदेह अखेर पंचगंगा नदीत सापडला आहे. उत्तरेश्वर पेठेतील धनवडे गल्ली इथल्या 50 वर्षीय कल्पना महेश ओतारी या सोमवारी सकाळपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांसह संपूर्ण शहरात त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान आज मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाची शोध मोहिम सुरू होती.यादरम्यान त्यांचा मृतदेह जॅकवेलजवळ आढळून आला.
मृतदेहाची माहिती मिळताच त्यांच्या मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोल्हापुरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला;
|