बातम्या
सीपीआरमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण — दोषींवर कठोर कारवाईचा निर्णय
By nisha patil - 11/20/2025 3:18:24 PM
Share This News:
सीपीआरमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण — दोषींवर कठोर कारवाईचा निर्णय
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) बोगस दिव्यांग व आरोग्य प्रमाणपत्र प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले असून, दोषी डॉक्टर आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.
या प्रकरणासाठी नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉक्टर तसेच तत्कालीन शल्यचिकित्सकांकडून प्रमाणपत्र देताना गंभीर विसंगती व कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासन, आरोग्य विभाग आणि आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सततचा पाठपुरावा केला जाणार आहे. भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रमाणपत्र प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही डॉ. भिसे यांनी स्पष्ट केले.
सीपीआरमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण — दोषींवर कठोर कारवाईचा निर्णय
|