बातम्या
*आजरा साखर कारखान्याचे बॉयलर अग्नि-प्रदिपन कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 9/24/2026 7:17:46 PM
Share This News:
*आजरा साखर कारखान्याचे बॉयलर अग्नि-प्रदिपन कार्यक्रम संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदीपन, होम हवन विधी गुरुवार दि. 24.09.2026 इ. रोजी कारखान्याचे संचालक शिवाजी तुकाराम नांदवडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता शिवाजी नांदवडेकर यांचे शुभहस्ते होम हवन विधी आणि चेअरमन, व्हा. चेअरमन व मा. संचालक मंडळाच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल फडके यांनी केले. यावेळी त्यांनी कारखान्याने ऑफ सिझन कालावधीत केलेल्या ओव्हरहोलिंग कामाचा आढावा घेण्यात आला .
कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात आजरा साखर कारखान्याच्या सन 2026-27 या गळीत हंगामाकरीता 4 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यानुसार गळीत हंगामात आवश्यक परजिल्ह्यातील व स्थानिक अशा एकुण 360 तोडणी वाहतुकीचे करार पुर्ण करून सदर यंत्रणेस ऍडव्हान्स वाटप केलेले आहे. कारखान्याने ठेवलेल्या उदिष्टा प्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा या करीता आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील ऊस नोंदीचे काम पुर्ण झाले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने आणणेचे नियोजन शेती खात्यामार्फत केलेले आहे. आपला कारखाना सन 1997-98 पासुन सुरू असुन कारखान्याची मशिनरी जुनी झाली आहे. त्यामुळे नामदार हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातुन यावर्षी सक्षम ओव्हरहोलिंगचे काम केले असुन सदरची कामे कर्मचा-यांनी वेळेत पुर्ण केलेली असुन कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज ठेवलेला आहे. गेल्या चार पाच वर्षापासुन कर्मचा-यांना दिपावली बोनसची खंडीत झालेली परंपरा बदलुन कर्मचा-यांचे कारखाना सुरू करण्यामागील त्यागाची भुमिका लक्षात घेवून त्यांना यावर्षी दिपावली सणासाठी 8.33 टक्के बोनस देण्याचे जाहीर केले. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या तारखेस कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ देखील लवकरच घेवून वेळेत कारखाना सुरू करणेचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँकेचे संचालक व बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई,सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के. सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नि)एम.आर.पाटील, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील,मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, एच. आर. मॅनेंजर सुभाष भादवणकर, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर व अन्य अधिकारी व कामगार संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी मानले.
*आजरा साखर कारखान्याचे बॉयलर अग्नि-प्रदिपन कार्यक्रम संपन्न
|