बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन सतर्क

Bomb threat to blow up Collectors office


By nisha patil - 12/12/2025 1:54:41 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्यानंतर प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या मेलमध्ये कार्यालयात ५ किलो आरडीएक्स ठेवले असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. धमकीची माहिती समोर येताच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना हा मेल प्राप्त झाला असून त्यांच्या आदेशानुसार पोलिस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तत्काळ बंद करून संपूर्ण भागात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. अचानक मिळालेल्या धमकीमुळे कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन सतर्क
Total Views: 494