बातम्या

दिव्यांगांसाठी ‘निरामय’ विमा योजनेला चालना; जिल्हा परिषदेकडून ५ लाखांची मदत

Boost for Niramaya insurance scheme for persons


By Administrator - 7/7/2026 2:02:02 PM
Share This News:



दिव्यांगांसाठी ‘निरामय’ विमा योजनेला चालना; जिल्हा परिषदेकडून ५ लाखांची मदत

सिंधुदुर्ग :गवस शुभम दिव्यांग व्यक्तींना आरोग्य संरक्षण व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित ‘निरामय आरोग्य विमा योजना व कायदेशीर पालकत्व’ जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात १७० जणांनी सहभाग घेतला.
 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ‘निरामय आरोग्य विमा’ योजनेच्या वार्षिक ५०० रुपयांच्या हप्त्यासाठी जिल्हा परिषद निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या निर्णयामुळे अधिकाधिक दिव्यांगांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.
 

कार्यक्रमात निरामय आरोग्य विमा योजना, कायदेशीर पालकत्व, यूडीआयडी कार्डचे महत्त्व तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संवाद सत्रात दिव्यांग व पालकांनी विविध समस्या मांडल्या असून प्रशासनाने त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


दिव्यांगांसाठी ‘निरामय’ विमा योजनेला चालना; जिल्हा परिषदेकडून ५ लाखांची मदत
Total Views: 22