ताज्या बातम्या
तोडली जातीची पातीची बंधने...आंतरजातिय विवाहातून पेरला नवा आदर्श भादवण येथे आंतरजातीय विवाह संपन्न
By nisha patil - 5/12/2025 11:32:23 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- आजरा तालुक्यातील आरदाळ गावातील मातंग समाजाची मुलगी काजल व भादवण गावचा मराठा समाजाचा मुलगा शिवाजी यांनी माणुसकीचे नाते एवढेच डोळ्यासमोर ठेवून दोघांनी जातीपतींना मूठ माती देत एक नवा अध्याय घडवत आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले.
दोन्हीकडील घरातील नातेवाईकांनी नेहमीच्या लग्नाप्रमाणे अरेंज मॅरेज करण्याचे बैठकीत ठरवून धुमधडाक्यात नवऱ्याच्या दारात लग्न करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे धुमधडाक्यात लग्न पार पडले.
या लग्नासाठी सामाजिक कार्यकर्ते कॉ.शिवाजी गुरव, ढोलकी वादक बयाजी ससाणे, हलगी वादक अण्णासो जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तानाजी गुरव, धनाजी ससाणे, शिवाजी जाधव, भिकाजी ससाणे, मुलीचे वडील रंगराव ससाणे, चुलते गंगाराम ससाणे, मामा सुरेश केंगारे, सामाजिक कार्यकर्ते मनोज लोखंडे, सिद्धू जंगम, मुलग्याचे वडील राजाराम खुळे व भाऊ सचिन खुळे यांच्यासह दोन्ही गावचे ग्रामस्थ, दोन्हीकडचे नातेवाईक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दोन्ही कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी केलेला विचार हा अत्यंत महत्त्वाचा असून याबाबत शासन स्तरावर सुद्धा कौतुक होत आहे.
तोडली जातीची पातीची बंधने...आंतरजातिय विवाहातून पेरला नवा आदर्श भादवण येथे आंतरजातीय विवाह संपन्न
|