बातम्या

भुदरगड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा भंडाफोड; हेड कॉन्स्टेबल रंगेहात जेरबंद

Bribery busted at Bhudargad police station Head constable caught red handed

By nisha patil - 4/29/2026 11:37:02 AM
Share This News:

भुदरगड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा भंडाफोड; हेड कॉन्स्टेबल रंगेहात जेरबंद

1 लाखांची मागणी, 50 हजारांवर सौदा; ACB चा सापळा यशस्वी
पंटरमार्फत लाच घेताना सुभाष चौगुले ताब्यात; विभागात खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष चौगुले याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. अपघातातील गाडी परत देण्यासाठी चौगुले याने सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेरीस 50 हजार रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदाराने ACB कडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि पंटरमार्फत लाच स्वीकारताना चौगुलेला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

भुदरगड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा भंडाफोड; हेड कॉन्स्टेबल रंगेहात जेरबंद
Total Views: 6