विशेष बातम्या
महादेवी हत्तीण परत नांदणीत आणा!" – शिवसेनेची स्पष्ट भूमिका
By nisha patil - 4/8/2025 3:00:55 PM
Share This News:
महादेवी हत्तीण परत नांदणीत आणा!" – शिवसेनेची स्पष्ट भूमिका
"लोकप्रतिनिधी वनताराला पूरक भूमिका का घेत आहेत?" – संतप्त सवाल
"महादेवी हत्तीण नांदणीत परत आणा!" अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली असून, वनताराला पूरक भूमिका घेतलेल्या लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. नांदणी मठातील हत्तीण ही साडेचारशे वर्षांची धार्मिक परंपरा असून, तिला केवळ प्राणी समजणं चुकीचं आहे, असे उपनेते संजय पवार यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेच्या मते, हत्तीणीचा परतावा ही भावनिक नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे. सरकारने यावर तातडीने भूमिका घ्यावी, अन्यथा शिवसेना संसदीय पातळीवर आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून तीव्र लढा उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महादेवी हत्तीण परत नांदणीत आणा!" – शिवसेनेची स्पष्ट भूमिका
|