बातम्या

मराठा आंदोलनासाठी दसरा चौकात एकत्र जमले बांधव “

Brothers gathered at Dussehra Chowk


By nisha patil - 8/29/2025 3:39:58 PM
Share This News:



मराठा आंदोलनासाठी दसरा चौकात एकत्र जमले बांधव “

आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी नाही” — आंदोलकांचा निर्धार 

शहरातील दसरा चौकात मराठा आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र जमले. “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, दिलीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक मुंबईकडे रवाना झाले. आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात ते सहभागी होणार असून “मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी नाही” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दरम्यान, महायुती सरकार सत्तेत आल्याला आठ महिने उलटले तरी आरक्षणाचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनापूर्वी सरकारकडून हालचाली वेगवान झाल्याचे समजते.


मराठा आंदोलनासाठी दसरा चौकात एकत्र जमले बांधव “
Total Views: 79