विशेष बातम्या

इचलकरंजीत बँक व्यवस्थापकाचा निर्घृण खून; बारमधील वादातून हत्येचा संशय

Brutal murder of Ichalkaranjit bank manager


By nisha patil - 10/28/2025 4:49:20 PM
Share This News:



इचलकरंजीत बँक व्यवस्थापकाचा निर्घृण खून; बारमधील वादातून हत्येचा संशय

इचलकरंजी शहरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. खासगी बँकेतील व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) यांचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी रात्री ते कोल्हापूर रस्त्यावरील बारमध्ये गेले असता वेटरशी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर थोड्याच वेळात पेट्रोल पंपासमोर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


इचलकरंजीत बँक व्यवस्थापकाचा निर्घृण खून; बारमधील वादातून हत्येचा संशय
Total Views: 47