बातम्या

अर्थसंकल्प नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

Budget Reaction of Namdar Hasan Saheb Mushrif


By nisha patil - 7/3/2026 12:35:23 PM
Share This News:



अर्थसंकल्प
नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 - 27 चा अर्थसंकल्प जाहीर केला. आमचे लोकनेते अजितदादा पवार यांना तो समर्पित केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अनेक संतांच्या व नेत्यांच्या स्मारकासोबत अजितदादा यांचेही स्मारक उभा करण्याची घोषणा केली. विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट अर्थसंकल्प मांडला गेला आहे. शेतकऱ्यांना तर भरभरून देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी केला. 
            
महाराष्ट्र सरकारने सादर केलेला महाबजेट २०२६ हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून विशेषतः कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपये पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास  हजार रुपयांपर्यत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय दिलासादायक आहे. त्याचबरोबर साडेसात अश्वशक्तीपर्यंत कायम विज बिल माफ अशा अनेक शेतकऱ्यांच्यासाठी योजना. तसेच, शेत पाणंद रस्ते योजना, दिवसा वीजपुरवठा तसेच पशुधन संवर्धनासाठी घेतलेले निर्णय ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना डिजिटल माध्यमातून पोहोचवण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे.
        

एक हजार लोकसंख्येपर्यंत गावांना सिमेंट काँक्रीटचे रस्ते, प्रधानमंत्री सडक योजना,  मुख्यमंत्री सडक योजना यातील ग्रामीण भागांना फार मोठ्या प्रमाणात निधी यामध्ये मिळाला. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयटी पार्क मंजूर करून सुशिक्षित बेरोजगारांना काम. त्याशिवाय यापूर्वी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, काल जोतिबाचा आराखडाही मंजूर झाला. आता दत्त मंदिर नृसिंहवाडी आराखड्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. पूरहानीसाठी जागतिक बँकेसाठी ३२०० कोटी, विकसित महाराष्ट्र पाच ट्रिलियन यामध्ये महाराष्ट्र फार मोठी भूमिका बजावेल. सामान्य माणसावर कर वाढवला जाणार नाही, ही सगळ्यात समाधानाची बाब आहे.    
       
राज्याचा कृषी निधी वाढवण्याचा संकल्प, मत्स्य व्यवसायासाठी मोठा निधी आणि शेतीसाठी भांडवली गुंतवणूक वाढवण्याचे धोरण यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. या बजेटमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 


अर्थसंकल्प नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
Total Views: 9