बातम्या

शिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर 

Budget showing the path of development of education


By nisha patil - 5/2/2026 4:26:01 PM
Share This News:



शिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर 
 

कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: केंद्र सरकारचा अर्थसंकल्प-२०२६ हा शिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. केदार मारुलकर यांनी काल केले.
 

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वाणिज्य विभागांतर्गत “अर्थसंकल्प २०२६: विकसित भारताकडे वाटचाल” या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. संचालक डॉ. कृष्णा पाटील अध्यक्षस्थानी होते. उपकुलसचिव विनय शिंदे प्रमुख उपस्थित होते.
 

डॉ. मारुलकर म्हणाले, अर्थसंकल्पातील तरतुदींमधून देशाच्या विकासाची दिशा स्पष्ट दिसते. वाणिज्य विषयाच्या  विद्यार्थ्यांनी या अर्थसंकल्पाचे सखोल विश्लेषण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प वाचनाची नवी दृष्टी प्राप्त केली पाहिजे. अर्थसंकल्पातून ‘विकसित भारता’चा मार्ग स्पष्ट दिसत असल्यामुळे तो देशासाठी महत्वाचा आहे.
 

अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था, शिक्षण, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, कररचना आणि सामाजिक कल्याण या बाबींवरील तरतुदींचे त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
 

डॉ. कृष्णा पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले, अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी मार्गदर्शक म्हणून काम करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तो बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. सुशांत माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमन लोहार यांनी परिचय करून दिला. डॉ.सचिन  देठे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष देवेकर यांनी आभार मानले.


शिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर 
Total Views: 10