बातम्या

Bunty Patil...सायबर गुन्ह्यांवर बंटी पाटलांचा रोखठोक सवाल?

Bunty Patil's


By Administrator - 4/7/2025 11:59:17 AM
Share This News:



सायबर गुन्ह्यांवर बंटी पाटलांचा रोखठोक सवाल?

मुख्यमंत्री फडणवीस यांचा माहितीपूर्ण खुलासा

राज्यात गेल्या दहा वर्षांमध्ये विविध फसवणूक योजनांमधून तब्बल १०५ लाख गुंतवणूकदारांची २२,५५२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं सरकारने मान्य केलं आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तरात आमदार सतेज पाटील यांनी सायबर गुन्ह्यांवर ठोस पावलं उचलण्याची मागणी केली, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात प्रत्येक पोलीस घटकात 'आर्थिक गुप्तवार्ता कक्ष' सुरू करण्यात आले असून या माध्यमातून गुंतवणूकदारांची आगाऊ फसवणूक टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सतेज पाटील यांनी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नात डिजिटल अरेस्ट, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग फसवणूक, ओटीपीच्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक अशा गुन्ह्यांमध्ये हजारो कोटींची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यांनी यासाठी जिल्हास्तरावर सायबर यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.


Bunty Patil...सायबर गुन्ह्यांवर बंटी पाटलांचा रोखठोक सवाल?
Total Views: 101