बातम्या

अंबप येथे दोन ठिकाणी घरफोडी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Burglars caught on CCTV camera at two places in Ambap


By nisha patil - 9/13/2025 6:10:06 PM
Share This News:



अंबप येथे दोन ठिकाणी घरफोडी  चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
 

अंबप : किशोर जासूद अंबप (ता. हातकणंगले) येथे रात्रीत दोन ठिकाणी बंद घरांचे कडी तोडून घरफोड्या केल्या यामध्ये किरकोळ रक्कम चोरट्यांचा हाती लागली असली तरी या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
       

 स्थानिकांच्याकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुमारे आठ चोरटे गावात शिरले. ते पाटील गल्ली व तेली गल्लीत शिरले‌. त्यांनी अनिल पाटील, आनंदा पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला, यामध्ये घरातील साहित्य विस्कळीत केले. पुढे वसंत विभुते येथे मुलगा जागा असल्याने येथे चोरीचा प्रयत्न फसला. अनिल पाटील यांच्या घरातून पंधरा हजार रुपये रक्कम चोरट्याने लंपास केली. चोरटे आंबेडकर चौक व महादेव गल्ली या चौकात सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले. याची माहिती उपसरपंच असिफ मुल्ला यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून देऊन लोकांना जागे केले.

सकाळी पोलिसांनी श्वान द्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण चोरटा पाटील गल्ली येथील चौकातच घुटमळला. पेेेेेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.


अंबप येथे दोन ठिकाणी घरफोडी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Total Views: 83