बातम्या

शिरढोणमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला; मोबाईलमुळे संशयितांचा माग

Burglary attempt foiled in Shirdhon


By nisha patil - 10/20/2026 12:14:08 AM
Share This News:



शिरढोणमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला; मोबाईलमुळे संशयितांचा माग
 

पोलिस पाटील दाम्पत्याच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न उधळला; अल्पवयीन संशयित ताब्यात
 

शिरढोण प्रतिनिधी ( संजय गायकवाड ) /ता.१९ शिरढोण-कुरुंदवाड रोडवर बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस पाटील अनुराधा जाधव व त्यांचे पती आण्णासो जाधव यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पडलेल्या मोबाईलमुळे पोलिसांना तपासाचा धागा मिळाला असून, एका अल्पवयीन संशयिताला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
     

हुपरी येथे वास्तव्यास असलेल्या कृष्णकांत सहदेव जाधव यांच्या शिरढोण येथील बंद घराचे कुलूप दोन तरुण तोडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या जाधव दाम्पत्याला हा प्रकार दिसला. आण्णासो जाधव यांनी विचारणा करताच तरुणांनी पळ काढला. यावेळी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडला.सदरचा मोबाईल पोलिस पाटील अनुराधा जाधव यांनी कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिला. मोबाईलवर येणाऱ्या फोनच्या आधारे पोलिसांनी महाराणा प्रताप चौकातून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
       

जुन्या घरफोड्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून
संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजताच चोरी व घरफोडीच्या घटनांतील नागरिकांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. जुन्या गुन्ह्यांचा उलगडा होणार का, अशी विचारणा त्यांनी केली. या प्रकरणातून अन्य गुन्ह्यांचे धागेदोरे मिळतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून ग्रामीण भागात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे


शिरढोणमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला; मोबाईलमुळे संशयितांचा माग
Total Views: 4