बातम्या
कोल्हापुरात घरफोडीचा पर्दाफाश! २४ तासांत एकजण ताब्यात; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By nisha patil - 10/21/2026 2:57:41 PM
Share This News:
कोल्हापुरात घरफोडीचा पर्दाफाश! २४ तासांत एकजण ताब्यात; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
शहरातील शिवाजी पेठ परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. तत्परतेने तपास करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत दोन सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे गंठण आणि दुचाकी असा एकूण १६ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजी पेठ परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तत्परतेने तपास करत संशयिताला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोल्हापुरात घरफोडीचा पर्दाफाश! २४ तासांत एकजण ताब्यात; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
|