बातम्या

घरफोडी टोळीचा पर्दाफाश! ३ आरोपी जेरबंद, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Burglary gang busted


By Administrator - 3/31/2026 12:07:09 PM
Share This News:



घरफोडी टोळीचा पर्दाफाश! ३ आरोपी जेरबंद, २० लाखांचा मुद्देमाल जप्त
 

 प्रतिनिधी हसन तकीलदार- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली असून ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. गडहिंग्लज, आजरा, भुदरगड व चंदगड परिसरात दिवसा बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा तपासादरम्यान पर्दाफाश झाला. उजळाईवाडी येथे सापळा रचून दोन आरोपींना पकडण्यात आले, तर तिसऱ्याला नंतर अटक करण्यात आली.
 

आरोपींकडून १०० ग्रॅम सोने, २३० ग्रॅम चांदी, वाहनांसह एकूण ₹20.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली असून जिल्ह्यातील घरफोडी टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.


घरफोडी टोळीचा पर्दाफाश! ३ आरोपी जेरबंद, २० लाखांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 15