बातम्या
बीएसएनएल क्वार्टर्समध्ये घरफोडी
By nisha patil - 12/7/2025 3:21:28 PM
Share This News:
बीएसएनएल क्वार्टर्समध्ये घरफोडी
36 लाख 75 हजारांचा ऐवज लंपास, 12 तासांत आरोपी जेरबंद
जयसिंगपुरातील बीएसएनएल क्वार्टर्समधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुनीता दीपक केरीपाळे यांच्या घरात गुरुवारी सकाळी चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 36 लाख 75 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केवळ 12 तासांत छडा लावत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.राजू रामय्या महादेपल्ली असं आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा इथं राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली.
बीएसएनएल क्वार्टर्समध्ये घरफोडी
|