बातम्या

तारदाळमध्ये मध्यदिवसात घरफोडी; तिजोरीतील रोकड व सोन्याचे दागिने लंपास

Burglary in broad daylight in Tardal


By nisha patil - 3/12/2025 1:05:34 PM
Share This News:



तारदाळ येथे भर दुपारी बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे 5 लाख 76 हजार रुपये रोकड व 9 तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी दुपारी 4.15 वाजता उघडकीस आली.

याबाबत हरी मारुती चोपडे (वय 44, रा. निमशिरगाव रोड, ज्ञानेश्वरनगर, तारदाळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी बाहेर गेले होते तर मुले शाळेत होती. घर पाहणाऱ्या सुशीला चोपडे या दुपारी 3 वाजता जवळच्या पाहुण्यांकडे गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांनी तिजोरी अस्ताव्यस्त पाहून चोरीची घटना लक्षात आणून दिली.

घटनेची माहिती मिळताच पो.नि. सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, गुन्हे प्रकटीकरणचे अविनाश मुंगसे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही पाहणी करत तपासाची दिशा निश्‍चित केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून शहापूर पोलिस तपास करीत आहेत.

ही दुपारच्या वेळची घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


तारदाळमध्ये मध्यदिवसात घरफोडी; तिजोरीतील रोकड व सोन्याचे दागिने लंपास
Total Views: 31