बातम्या

माजी तालुकाध्यक्षांच्या बंगल्यात घरफोडी – ७८ वर्षीय अक्कमहादेवींवर चाकूने वार, १५ हजारांची रोकड लुटली!

Burglary in former taluka president


By nisha patil - 8/11/2025 3:47:19 PM
Share This News:



माजी तालुकाध्यक्षांच्या बंगल्यात घरफोडी – ७८ वर्षीय अक्कमहादेवींवर चाकूने वार, १५ हजारांची रोकड लुटली!

गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावात आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर यांच्या 'कृष्णाई' बंगल्यात घुसलेल्या चोरट्याने पाटील यांच्या पत्नी अक्कमहादेवी (वय ७८) यांच्यावर चाकूने वार करत घरातील १५ हजारांची रोकड लुटली.

सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी अक्कमहादेवी घरी एकट्याच होत्या. दरवाजावर टकटक होताच त्यांनी दरवाजा उघडला, आणि हेल्मेट व मास्क घातलेल्या चोरट्याने कुरिअर बॉय असल्याचे सांगत आत प्रवेश केला. त्याने चाकूचा धाक दाखवून पैसे व दागिन्यांची मागणी केली. कपाटातील १५ हजार रुपये मिळाल्यानंतर आणखी मागणी करताच अक्कमहादेवींनी नकार दिला, आणि त्यावरच चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार केले.

गंभीर जखमी अवस्थेत अक्कमहादेवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या, मात्र त्यांनी कशीबशी बाहेर येत आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी धाव घेत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अक्कमहादेवींना रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, सिद्धचक्र विधान महामहोत्सवाच्या रथोत्सवामुळे संपूर्ण गाव रस्त्यावर असल्याचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी केली असल्याचा संशय आहे. पोलिस ठसे, श्वानपथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे.

 चोरट्याचे वय अंदाजे २५ ते ३०, उंची साडेपाच फूट; कुरिअर बॉय बनून केला हल्ला!
गडहिंग्लज पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


माजी तालुकाध्यक्षांच्या बंगल्यात घरफोडी – ७८ वर्षीय अक्कमहादेवींवर चाकूने वार, १५ हजारांची रोकड लुटली!
Total Views: 32