बातम्या
सौदी अरेबियात उमरा यात्रेकरूंना बसचा भीषण अपघात; 42 जणांचा मृत्यू
By nisha patil - 11/17/2025 1:15:25 PM
Share This News:
सौदी अरेबियातील मेदीना महामार्गावर उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. या अपघातात ४२ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
धडकेनंतर बसमध्ये अचानक आग लागली आणि त्यामुळे मृतांची संख्या मोठी असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मृतांमध्ये भारतीय यात्रेकरूंचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी सौदी पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत तपास सुरू आहे आणि अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही.
भारतीय दूतावासाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नातेवाईकांसाठी कंट्रोल रूम आणि हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि अधिकृत अपडेट्सची प्रतीक्षा आहे.
सौदी अरेबियात उमरा यात्रेकरूंना बसचा भीषण अपघात; 42 जणांचा मृत्यू
|