राजकीय
सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक रूपात जनसेवेसाठी सज्ज : मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 5/23/2026 3:49:01 PM
Share This News:
सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक रूपात जनसेवेसाठी सज्ज : मंत्री हसन मुश्रीफ
मे अखेरीस सीपीआरच्या नव्या वास्तूचे लोकार्पण; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
‘कोल्हापूरचा श्वास’ नव्या रूपात सज्ज; सीपीआर उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक रूपात जनसेवेसाठी सज्ज : मंत्री हसन मुश्रीफ
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) कोल्हापूर, नूतनीकरण वास्तूचे लोकार्पण मे अखेरीस मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांनी दिली. शेंडा पार्क येथे विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक व देखण्या स्वरूपात जनतेच्या सेवेसाठी सज्ज होत असून, मुख्यमंत्र्यांची तारीख मिळताच उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या निवासी डॉक्टर व विद्यार्थी वसतिगृह, नर्सिंग हॉस्टेल, प्रशिक्षण केंद्र तसेच क्रीडा सुविधा आणि जुन्या वसतिगृहांच्या नूतनीकरण कामांचा आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे डिसेंबरअखेर पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत पाणी, रस्ते, वीज व एसटीपी प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक रूपात जनसेवेसाठी सज्ज : मंत्री हसन मुश्रीफ
|