बातम्या
दिवाळीत सीपीआरची ओपीडी दोन दिवस बंद! आपत्कालीन सेवा सुरूच!
By nisha patil - 3/11/2026 3:43:01 PM
Share This News:
दिवाळीत सीपीआरची ओपीडी दोन दिवस बंद! आपत्कालीन सेवा सुरूच!
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी जाण्यापूर्वी नागरिकांनी हे वेळापत्रक नक्की लक्षात ठेवा. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआरची बाह्यरुग्ण सेवा ८ आणि १० नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. तर ९ आणि ११ नोव्हेंबर रोजी ओपीडी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
८ नोव्हेंबर रोजी रविवारची सुट्टी आणि १० नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ओपीडी बंद असली तरी रुग्णांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण रुग्णालयातील अपघात विभाग, आंतररुग्ण विभाग, सर्व वैद्यकीय सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया २४ तास पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी ओपीडीच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच रुग्णालयात यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.
दिवाळीत सीपीआरची ओपीडी दोन दिवस बंद! आपत्कालीन सेवा सुरूच!
|