विशेष बातम्या

सीपीआरला नवे अधिष्ठाता — परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार!

CPR gets new dean

By nisha patil - 10/30/2025 5:08:00 PM
Share This News:

सीपीआरला नवे अधिष्ठाता — परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार!

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) कोल्हापूरच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार परभणी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने बुधवारी सायंकाळी याबाबतचा शासन आदेश जारी केला.

दरम्यान, डॉ. सत्यवान मोरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. अजित लोकरे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांना पदमुक्त करून डॉ. भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीपीआरमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात, त्यामुळे कायमस्वरूपी अधिष्ठात्याची नेमणूक करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

सीपीआरला नवे अधिष्ठाता — परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार!
Total Views: 119