बातम्या

सीपीआर औषध खरेदी घोटाळा; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

CPR medicine purchase scam


By nisha patil - 8/22/2025 4:16:13 PM
Share This News:



सीपीआर औषध खरेदी घोटाळा; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) मधील तब्बल ४ कोटी ८७ लाख ३० हजार ५०० रुपयांच्या औषध व सर्जिकल किट खरेदी घोटाळ्याप्रकरणी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

या घोटाळ्यात बनावट लेटर पॅड व खोटी स्वाक्षरी वापरून खरेदी प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप आहे. निविदा प्रक्रिया न राबवता थेट व्ही.एस. इंटरप्राईजेस (मालक मयूर लिंबेकर) यांना ठेका देण्यात आला. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुरवठा करण्यात आलेले सिलिकॉन जेल ॲडव्हाईस ड्रेसिंग पॅड निकृष्ट दर्जाचे असून त्याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत प्रचंड जास्त असल्याचा आरोप आहे. हा माल सीपीआरमध्ये निष्प्रयोजन पडून आहे, त्यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात,

  • सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,

  • आरोपी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित/बडतर्फ करावे,

  • निकृष्ट मालाचा तपास करून संपूर्ण रक्कम वसूल करावी,

  • तसेच राज्यभरातील अशाच घोटाळ्यांची चौकशी करावी,
    अशा मागण्या केल्या आहेत.

निवेदनात विद्यमान अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांच्यावरही आरोपींना वाचविण्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनसेने इशारा दिला आहे की, तीन दिवसांत कारवाई न झाल्यास कोल्हापूरमध्ये तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.



सीपीआर औषध खरेदी घोटाळा; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
Total Views: 431