बातम्या
महिला व बाल कल्याणच्या योजनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे आवाहन
By nisha patil - 9/16/2025 5:00:58 PM
Share This News:
महिला व बाल कल्याणच्या योजनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे आवाहन
कोल्हापूर, दि. 16 महिला व बाल कल्याण विभागाकरीता सन 2025-26 साठी जि. प. स्वनिधीमधून प्राप्त झालेल्या 10 टक्के तरतुदीनुसार ग्रामीण भागातील मुली व महिलांकरीता विविध योजना निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी अर्जाचा नमुना विनामुल्य गट स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), सर्व पंचायत समिती कार्यालयामार्फत वाटप करण्यात येणार असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनांचे अर्ज सादर करावेत .
योजना पुढीलप्रमाणे आहेत - अनाथ / एकल पालक इ.1 ली ते 10 वी मधील मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरविणे, तारांगणा क्रीडा, कला व शिक्षण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या ग्रामीण भागातील 18 वर्षाच्या आतील मुलांचा / मुलींचा सत्कार करणे, सर्वसाधारण घटकातील इ. 7 वी ते 12 वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान देणे, सर्वसाधारण घटकातील इ. 5 वी ते 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरविणे, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील महिलांना पिठाची गिरण खरेदी करीता अनुदान पुरविणे, अनुसूचित जाती घटकातील इ. 5 वी ते 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलींना सायकलीसाठी अनुदान पुरविणे तसेच ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील महिलांना छोटे किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य पुरविणे आदी योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी अर्ज करावेत असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे .
महिला व बाल कल्याणच्या योजनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाचे आवाहन
|