बातम्या

“प्राचार्य रा. कृ. कणबरकर – आठवणी आणि अनुभव” ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

Call for submission of articles for the book


By nisha patil - 4/8/2025 4:22:04 PM
Share This News:



“प्राचार्य रा. कृ. कणबरकर – आठवणी आणि अनुभव” ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन
 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी “प्राचार्य रा. कृ. कणबरकर – आठवणी आणि अनुभव” या विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या ग्रंथासाठी प्राचार्य कणबरकर सरांबरोबर कार्य केलेले सहकारी, विविध महाविद्यालयांतील माजी विद्यार्थी, विद्यापीठीन अधिकारी व प्राध्यापक यांच्याकडून लेख स्वरूपात अनुभव आणि आठवणी मागवण्यात येत आहेत. लेखात सरांचा आपल्याला भावलेला एखादा गुण, मूल्य, प्रेरणादायी प्रसंग याचा उल्लेख अपेक्षित आहे.

या ग्रंथासाठी लेख संकलन आणि संपादनाची जबाबदारी डॉ. भालबा विभूते, डॉ. डी. यू. पवार, डॉ. रमेश जाधव, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. दिनकर पाटील आणि डॉ. नमिता खोत (प्राचार्य कणबरकर सरांची कन्या) यांच्या समितीकडे देण्यात आली आहे.

लेखासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. इच्छुकांनी आपले लेख दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत:

📮 पत्ता:
डॉ. नमिता बाबासाहेब खोत,
‘वक्रतुंड’, प्लॉट नं. २१, आर. के. नगर, सोसा. नं. ४, मोरेवाडी, कोल्हापूर – ४१६०१३
📱 मोबाईल (व्हॉट्सअ‍ॅप): ९८९००७०४०४
📧 ई-मेल: namitalibrarian@gmail.com

लेखासोबत नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल स्पष्टपणे नमूद करावा.
प्राचार्य कणबरकर सरांच्या स्मृतींना लेखांच्या रूपाने साजेसा गौरव देण्याची ही एक पर्वणी असल्याचे आयोजकांनी सांगितले.


“प्राचार्य रा. कृ. कणबरकर – आठवणी आणि अनुभव” ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन
Total Views: 103