बातम्या
पंत वालावलकर हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती एल्गार
By nisha patil - 10/15/2026 3:51:43 PM
Share This News:
पंत वालावलकर हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती एल्गार
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूलमध्ये पेस ग्रुप पुणे आणि शांताराम पंत वालावलकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती एल्गार करण्यात आला . यावेळी मार्गदर्शक आणि रिसोर्स पर्सन प्रशांत भोसले यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली .
याबरोबरच व्यसनमुक्तीसाठी आपल्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी जनजागृती केली . व्यसनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सहशिक्षक प्रशांत भोसले यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम याबाबतची चित्रफीत दाखवली .
तसेच काही काही प्रसंग सांगून याबाबत योग्य पद्धतीने समुपदेशन केले . यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षिका सरीता शिंदे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले, प्रमोद कुलकर्णी, राजेंद्र बनसोडे, विमल धायगुडे, समीर जमादार,संतोष पोवार,सं जित सनगर, अनुपमा पन्हाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशांत भोसले यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला . व्यसनाला नाही म्हणा आणि जीवनाला होय म्हणा या घोषवाक्यानुसार व्यसनी व्यक्तींचे समुपदेशन करताना काय काळजी घ्यावी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत विवेचन केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी आभार प्रदर्शन केले . सिद्धी कपिलेश्वरी यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत दळवी यांनी आभार प्रदर्शन केले .
पंत वालावलकर हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती एल्गार
|