बातम्या
सैनिक टाकळी एमआयडीसीचा निर्णय रद्द करा; अन्यथा २३ नोव्हेंबरला कोल्हापुरात ठिय्या आंदोलन!
By nisha patil - 11/20/2026 3:40:57 PM
Share This News:
सैनिक टाकळी एमआयडीसीचा निर्णय रद्द करा; अन्यथा २३ नोव्हेंबरला कोल्हापुरात ठिय्या आंदोलन!
‘एमआयडीसी हटवा, पंचक्रोशी वाचवा’चा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.....
प्रतिनिधी : आचिन हेरवाडे सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नावरून परिसरातील नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करून एमआयडीसी स्थापनेचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘चला कोल्हापूर, चला कोल्हापूर’, ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणांसह आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सैनिक टाकळी पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावित एमआयडीसीमुळे पंचक्रोशीतील शेती, जमीन आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची चिंता आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एमआयडीसीबाबतचा शासन निर्णय रद्द करून परिसरातील शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
या आंदोलनात सैनिक कल्याण मंडळ, सैनिक टाकळी, सैनिक टाकळी पंचक्रोशी जल-जमीन-जीवन बचाव कृती समिती आणि आंदोलन अंकुश संघटना सहभागी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.
‘एमआयडीसी हटवा, पंचक्रोशी वाचवा’ या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
सैनिक टाकळी एमआयडीसीचा निर्णय रद्द करा; अन्यथा २३ नोव्हेंबरला कोल्हापुरात ठिय्या आंदोलन!
|