बातम्या

विनायक आवळेंची तडीपारी रद्द करा! सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Cancel the deportation of Vinayak Amla


By nisha patil - 11/18/2026 3:09:23 PM
Share This News:



विनायक आवळेंची तडीपारी रद्द करा! सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते विनायक शिवाजी आवळे यांच्यावरील तडीपारीची कारवाई तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२५ रोजी विनायक आवळे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई राजकीय द्वेषातून आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

विनायक आवळे यांनी गोरक्षण, सामाजिक जागृती, जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण, शालेय पोषण आहारातील कथित भ्रष्टाचार, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील गैरसोयी, प्रदूषण तसेच अवैध मटका व्यवसायाविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच कागल पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीविरोधातही त्यांनी आंदोलन केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

एका सामाजिक कार्यकर्त्याला आपल्या घरापासून आणि समाजापासून दूर ठेवणे अन्यायकारक असल्याचे म्हणत, त्यांच्यावरील तडीपारीचा आदेश तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा सामाजिक कार्य करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.


विनायक आवळेंची तडीपारी रद्द करा! सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Total Views: 17