बातम्या

मेतके (ता. कागल) येथे कार फोडून दागिने चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडून ₹५३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Car break in and jewellery theft case solved in Metke Tel Kagal Local Crime Investigation Branch Kolhapur seizes valuables worth 53 lakh


By nisha patil - 2/21/2026 12:28:18 PM
Share This News:



मेतके  (ता. कागल) येथे कार फोडून दागिने चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडून ₹५३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी मेतके , ता. कागल येथे घडलेल्या कार फोडून दागिने चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत आरोपीकडून तब्बल ₹५३,४२,३३४/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. १३/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०६.३० ते ०७.०० वाजण्याच्या दरम्यान मेतके गाव हद्दीत सत्संगवाडी मंदिराजवळ उभी असलेली MH-14-KN-8810 क्रमांकाची कार अज्ञात चोरट्यांनी फोडून कारच्या डिक्कीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती.

याबाबत फिर्यादी यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला असता संशयित आरोपी वीरश नागप्पा वाघ (वय ४४, रा. दुर्गा अंबिका मंदिराजवळ, हेल्पेट, ता. देवगाव, जि. कर्नाटक) यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून सोन्याचे मोठे व लहान मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप्स, झुमके, रिंग, चैन, नेकलेस, चांदीचे ब्रेसलेट, चांदीच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण, चांदीचे कडे, मोबाईल हँडसेट तसेच KA-01-AR-4425 क्रमांकाची कार असा एकूण ₹५३,४२,३३४/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


मेतके (ता. कागल) येथे कार फोडून दागिने चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडून ₹५३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 17