खेळ
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!
By nisha patil - 10/24/2025 2:57:34 PM
Share This News:
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा डंका! 🎯
मुंबई येथे झालेल्या 59 व्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या तिघा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ग्वाल्हेर येथे होणाऱ्या 50 व्या राष्ट्रीय ज्युनिअर कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
मुलांच्या गटात ओमकार वडर व मोहम्मद तजीम शेख, तर मुलींच्या गटात ईश्वरी पाटील यांची निवड झाली आहे. एकाच वेळी तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सचिव आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्ट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
राज्यभरातील 160 खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांमध्ये पुण्याच्या आयुष्य गरूडने, मुलींमध्ये मुंबईच्या सोनाली कुमारीने, तर 21 वर्षांखालील युवा गटात रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व मुंबईच्या मिहिर शेख यांनी विजेतेपद मिळवले.
ग्वाल्हेर येथे 1 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष डॉ. अभिजित पाटील, तसेच पदाधिकारी व मार्गदर्शक मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!
|