बातम्या
विवेकानंद मध्ये "करिअर अपॉच्युनिटीज इन मायक्रोबायोलॉजी " या विषयावर गेस्ट लेक्चर संपन्न
By nisha patil - 9/19/2025 12:50:09 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये "करिअर अपॉच्युनिटीज इन मायक्रोबायोलॉजी " या विषयावर गेस्ट लेक्चर संपन्न
विवेकानंद महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र व बायोटक्नोलॉजी विभागाच्या वतीने "करिअर अपॉच्युनिटीज इन मायक्रोबायोलॉजी" या विषयावर दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी एल बी कॉलेज सातारा येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्हि. एस. पाटील यांनी बी. एस्सी व एम. एस्सी नंतर विदयाथोंना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीची माहीती दिली सदर व्यायान दरम्यान शिक्षण, संशोधन, फार्मास्युटिकल, इंडस्टीयल क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी तसेच सदर नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या विविध कंपन्या, सरकारी खाती, त्यासाठी दयाव्या लागणाऱ्या परीक्षा यांची सविस्तर माहिती त्यांनी मुलांना दिली. नोकरीसाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसुन विदयार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास व विविध कौशल्यावर भर दिला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
सदर व्याख्यानाच्या वेळी प्रा. व्हि. व्हि. मिसाळ यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केले तर आभार प्रा. डॉ. के. के. भिसे यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, विभाग प्रमुख डॉ. टी. सी. गौपाले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक व विदयार्थी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद मध्ये "करिअर अपॉच्युनिटीज इन मायक्रोबायोलॉजी " या विषयावर गेस्ट लेक्चर संपन्न
|