शैक्षणिक
व्यंकटराव शिक्षण संकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न.
By Administrator - 10/1/2026 11:25:46 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था,(सारथी )उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यकारी अधिकारी शिक्षण या पदावर काम करणारे डॉ. विलास पाटील यांनी जवळजवळ 300 विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्ता दहावी नंतर करिअर साठी विविध वाटांबद्दल आपल्या अमोघ वाणीतून मार्गदर्शन केले.
यासाठी त्यांनी समाजातील विविध व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी मिळवलेले त्यांच्या जीवनातील यश सांगितले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अथक परिश्रम जिद्द चिकाटी असणे गरजेचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी व्यंकटराव हायस्कूल आजरा बरोबरच आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित आदर्श हायस्कूल शिरसंगी, भादवण हायस्कूल भादवण या प्रशालेतीलही इयत्ता दहावीचे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, ए. के.पावले, एम. एम. देसाई , आर.पी. होरटे,सौ.ए.डी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही.पाटील व आभार व्ही. एच. गवारी यांनी मानले.
व्यंकटराव शिक्षण संकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न.
|