राजकीय
काँग्रेस फूंकणार शनिवारी मनपा निवडणुकीचे रणशिंग*
By nisha patil - 7/25/2025 3:58:35 PM
Share This News:
*काँग्रेस फूंकणार शनिवारी मनपा निवडणुकीचे रणशिंग*
*कोल्हापूर :* कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसने येत्या शनिवारी महानगपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्यादृष्टीने प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत पुनर्रचना व प्रभागांची संख्या वाढणार असल्याने त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
काँग्रेस फूंकणार शनिवारी मनपा निवडणुकीचे रणशिंग*
|