विशेष बातम्या

कै अरविंद गणेश जोशी यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा

Carrom tournament in memory of late Arvind Ganesh Joshi


By nisha patil - 5/30/2025 3:36:26 PM
Share This News:



कै अरविंद गणेश जोशी यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा

कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे मान्यतेने व प्रकाश क्लब उमा टाॅॅकिज चौक यांच्या वतीने कै.अरविद गणेश  जोशी यांच्या स्मरणार्थ    कॅरम स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर मंगळवार पेठेतील सनगर गल्ली येथील तालीम हाॅल मध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन  कोल्हापूर एस एस सी बोर्डाचे माजी डायरेक्ट व प्रा.मोहन तोरगलकर, कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव,व  श्नी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव राष्ट्रीय कॅरमपंटू शोभा कामत, , शिवशंकर भस्मे यांच्या हस्ते  करण्यात आले  या स्पर्धेसाठी  राष्ट्रीय पंच सुर्यकांत पाटील हे काम पहात आहे.
 

सदर तीन जिल्ह्यांतील एकूण एकशे पन्नास कॅरमपंटूनी भाग घेतला.आज झालेल्या स्पर्धेत
अख्तर शेख दर्शन कर्वे,, रोहित चौगुले, सम्राट लकडे, अस्लम शेख, ओमकार वडर यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील येथील राष्ट्रीय कॅरमपंटू जल्लाल मुल्ला , शुभम ढाणे,
योगेश भंडारी, सुधीर महपुरे तर सांगली मधूनआसिफ  सिपाई,सादीक,किरण लोंढे हे नामवंत कॅरमपंटू सहभागी होत आहे.
 

या स्पर्धेसाठी  सचिन पागे, गणेश गवळी, गौरव हुदले यांनी जेवणाची जबाबदारी स्वीकारली.
 या  स्पर्धेसाठी आर्थिक  सहाय्य नितीन सोनटक्के यांचे लाभले.स्पर्धा पहाणेस क्रीडा रसिकांनी भरपूर गर्दी केली होती.


कै अरविंद गणेश जोशी यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा
Total Views: 67