बातम्या
कोल्हापूरात गुळ व्यापाऱ्याच्या दुकानात 60 लाखांची रोख रक्कम चोरी
By nisha patil - 4/10/2025 9:26:36 AM
Share This News:
कोल्हापूरात गुळ व्यापाऱ्याच्या दुकानात 60 लाखांची रोख रक्कम चोरी
कोल्हापूर : शहरातील मार्केटयार्ड परिसरात मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. अरुण शंकरराव चौगुले (रा. रूईकर कॉलनी, कोल्हापूर) यांच्या गुळाच्या अडत दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाड घालून तब्बल ₹60 लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे.
ही घटना दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून ते 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत घडली. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून व दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील लोखंडी तिजोरी फोडून रोख रक्कम चोरली.
सदर चोरीत 500, 200 व 100 रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 305, 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अंकुश कारंडे करत आहेत.
मार्केटयार्डसारख्या गर्दीच्या व व्यापारी भागात घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूरात गुळ व्यापाऱ्याच्या दुकानात 60 लाखांची रोख रक्कम चोरी
|