बातम्या
जात पडताळणी कार्यालय 17 व 18 ला सुरु
By nisha patil - 1/16/2026 4:03:49 PM
Share This News:
कोल्हापूर -: राज्यातील 12 जिल्हापरिषदा तसेच त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला असून राखीव जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज सादर होत आहेत.
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 मध्ये नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अर्ज करण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर कार्यालय 17 व 18 जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु राहील. या दिवशी फक्त निवडणूक विषयक प्रकरणेच स्विकारली जातील. राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
जात पडताळणी कार्यालय 17 व 18 ला सुरु
|