बातम्या
सेवेतूनच साजरा वाढदिवस — रोहन व सारीका निर्मळ यांचा समाजसेवेचा तेजस्वी आदर्श!
By nisha patil - 11/11/2025 6:19:37 PM
Share This News:
सेवेतूनच साजरा वाढदिवस — रोहन व सारीका निर्मळ यांचा समाजसेवेचा तेजस्वी आदर्श!
हमीदवाडा (ता. कागल) – ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. सारीका रोहन निर्मळ यांच्या वाढदिवसानिमित्त “वाढदिवस सेवेतून साजरा” या संकल्पनेखाली एक आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत शालेय साहित्य वाटप व २५ एलईडी स्ट्रीट लाईट्सचे लोकार्पण करण्यात आले.
.%5B3%5D.jpg)
या उपक्रमामुळे हमीदवाडा प्रभाग क्र. २ (चावडी गल्ली, एरंड गल्ली, हुडा गल्ली) परिसर उजळून निघाला असून ग्रामस्थांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच कृष्णात बुरटे होते. या प्रसंगी रोहन निर्मळ आणि सौ. सारीका निर्मळ यांचा ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना रोहन निर्मळ म्हणाले,
“हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून हा उपक्रम समाजभावनेतून राबवला आहे. रोहन निर्मळ फाउंडेशन पुढील काळातही असेच समाजोपयोगी कार्य करत राहील.”
गुरुदास गुरव यांनी सांगितले,
“रोहन निर्मळ यांच्या प्रयत्नातून गावात रस्ते, गटर्स, स्मशानभूमी, देवालयाची दुरुस्ती, एलईडी लाईट्स आणि विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप अशी अनेक विकासकामे झाली आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळेच गावाचा विकास होतो.”
तर महेश जाधव म्हणाले,
“आम्ही योग्य लोकप्रतिनिधी निवडला याचा आम्हाला अभिमान आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवर्ग तसेच मान्यवर उपस्थित होते —
शिवसेना कागल तालुका अध्यक्ष समीर देसाई, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभुते, वायरमन आरागडे, महादेव मेतकेकर, अंकुश दुरडे, स्वप्नील हसबे, शशिकांत मोरबाळे, कमलेश रंगापुरे, प्रवीणसिंह सुळकुडे, विनायक सुळकुडे, रोहित बुरटे, ओंकार कुंभार, दीपक बुरटे, विशाल कुंभार, शंतनू विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मेस्त्री सर यांनी केले तर जितेंद्र कुंभार सर यांनी आभार मानले.
उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले,
“रोहन निर्मळ आणि सारीका निर्मळ यांच्या कार्यातून समाजसेवेचा तेजस्वी आदर्श दिसतो.”
व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न...सेवेतूनच साजरा वाढदिवस — रोहन व सारीका निर्मळ यांचा समाजसेवेचा तेजस्वी आदर्श!
|