राजकीय

*आजऱ्यात टीम सतेजच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Celebrations by Team Satej workers in Ajra


By nisha patil - 10/20/2026 12:15:27 AM
Share This News:



*आजऱ्यात टीम सतेजच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
 

*मिठाई वाटून, गुलाल उधळून फटाक्यांची अतिशबाजी करीत साजरा केला विजयोत्सव
 

*आजरा(हसन तकीलदार):-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासोबत दिग्गज नेत्यांची ताकत एका बाजूला तर आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांची समविचारी आघाडी एका बाजूला असताना समविचारी आघाडीने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारीत विजयाची शिट्टी वाजवली. गेल्या सहा ते सात महिन्यापासून सुरु असलेल्या राजकीय रणधुमाळीचा निकाल अखेर सतेजमय झाला. कोल्हापूर जिल्ह्याची जनता ही स्वाभिमानी आहे. बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप चालत नाही हे कोल्हापूरकरांनी सिद्ध करून दाखवले आहे. बॅलेट पेपरची सिद्धताही यामुळे सिद्ध झाली आहे. ठराव धारकांनी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमताने कौल देत महायुतीला जोरदार धक्का देत समविचारी आघाडीने 16 जागावर विजय संपादन केला तर महायुतीला 9 जागावर समाधान मानावे लागले. याच विजयाचा जल्लोष आजऱ्यातील टीम सतेजच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून, गुलाल उधळून आणि फटाक्यांच्या अतिशबाजीने साजरा केला. 
   

सर्वप्रथम शिवतीर्थावर छत्रपतीच्या चरणी पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी संजयभाऊ सावंत म्हणाले की,या निवडणुकीत ठरावधारकांनी भरभरून मते दिल्याने बंटी साहेबांच्या समविचारी पॅनलचा दणदणीत विजय झाला. बंटी साहेबाना महाविकास आघाडी, व समविचारी नेत्यांनी मदत केल्याने या विजयापर्यंत पोहचता आले. बंटी पाटील साहेबांच्या नियोजनाचा जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने नाद करु नये.
       

नौशादभाई बुड्डेखान म्हणाले की, गोकुळच्या पंचवार्षिक निवडणू्कीमध्ये बंटी पाटील साहेबांच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व ठरावधारकांचे आभार मानतो. कोल्हापूरचे नेतृत्व हे बंटी साहेबच करु शकतात हे सिद्ध झाले आहे. हा विजय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. सर्व ठरावधारकांनी बंटी साहेबांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास कायम राहील. येणाऱ्या काळात अखंड महाराष्ट्रात परिवर्तानाची लाट आणू.
 

  महायुतीच्या सगळ्या दिग्गजानी ताकत लाऊनही समविचारी आघाडीने मारलेली मुसंडी कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निकालाचा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ञाकडून वर्तवली जात आहे.
 

  यावेळी रवी भाटले, युवराज पोवार, बाळासाहेब पाटील, बाकीव खेडेकर, निसार लाडजी, सुफियान खेडेकर, इरफान लमतुरे, कृष्णा कोगेकर, विनायक पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह टीम सतेजचे आणि समविचारी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*आजऱ्यात टीम सतेजच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
Total Views: 5