बातम्या
बेंच मंजुरीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आनंदोत्सव..
By nisha patil - 2/8/2025 3:20:37 PM
Share This News:
बेंच मंजुरीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आनंदोत्सव..
आमदार राहुल आवाडे यांचा वकिलांकडून सत्कार..
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय होताच, इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्री शंभूतीर्थ चौकात साखर वाटून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयामुळे कोल्हापूरकरांची चार दशकांहून अधिक काळची मागणी पूर्ण झाली असून, महायुती सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा विश्वास जनतेमध्ये अधिक दृढ झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सत्र न्यायालयात वकिल बांधवांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार करत त्यांचे आभार मानले. सर्किट बेंचच्या मंजुरीमुळे जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेला बळकटी मिळणार असून, लोकांना आता मुंबई किंवा औरंगाबादला न जाता कोल्हापुरातच न्याय मिळणार आहे.
बेंच मंजुरीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आनंदोत्सव..
|