बातम्या
शाहू बँक चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष
By nisha patil - 3/9/2025 11:51:44 AM
Share This News:
शाहू बँक चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष
मराठा आरक्षणाचा तिढा सुटताच आनंदोत्सव
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण-आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा तिढा सुटला आणि प्रश्न मार्गी लागला. या निर्णयाचे स्वागत करत आज कोल्हापूरसह विविध ठिकाणी सकल मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला.
गणेशोत्सवाच्या वातावरणात हा प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त करत श्री गणेशाची सामूहिक आरती करण्यात आली. ऐतिहासिक शाहू बँक चौकातील भाई ग्रुपच्या गणपतीच्या साक्षीने सकल मराठा समाज बांधवांसह सर्वच समाज बांधव उपस्थित राहून आरती केली आणि त्यानंतर साखर पेढ्यांचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषेत रणवीर सरनाईक हे विशेष आकर्षण ठरले. हलगी-घुमका आणि कैचाळाच्या निनादात परिसर दणाणून गेला व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, राजेंद्र चव्हाण, राजू जाधव, डॉ. संभाजी पाटील, मंदार पवार, चंद्रकांत चिले, राजेंद्र थोरावडे, सुरेश अंबुसरे, कृष्णात चौगुले, रमेश चावरे, शुभम कारंडे, शरद वाकरेकर, अभिजीत ढवण, अमोल बुचडे, श्याम कांबळे, राजेश खेडकर, संकेत गवळी, शुभम पिसाळ, विश्वास चौगुले, प्रथम निकम, विशाल गायकवाड यांच्यासह असंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहू बँक चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष
|