बातम्या

ना.छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावर आनंदोत्सव; कोल्हापुरात साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांचा उत्सव

Celebrations over Chhagan Bhujbals appointment as a minister


By nisha patil - 5/22/2025 5:03:44 PM
Share This News:



ना.छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावर आनंदोत्सव; कोल्हापुरात साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांचा उत्सव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे नामदार छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे ओबीसी समाजात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध ओबीसी संघटना तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भुजबळ यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन त्यांची मंत्रिमंडळात निवड झाल्यामुळे कोल्हापूर येथे शिवाजी चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष शितल तेवढे, शहराध्यक्ष स्वाती काळे, शहराध्यक्ष श्रीकृष्ण घोडके, जिल्हा संपर्कप्रमुख अण्णासो खमले हट्टी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष तुकाराम लोहार यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठीचा लढा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला.


ना.छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावर आनंदोत्सव; कोल्हापुरात साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांचा उत्सव
Total Views: 96